Hero Banner
about-thumb
प्राधान्य जनसेवेला, प्रभागाच्या विकासाला..!

प्रिय बंधू भगिनी व वडीलधारे..!

माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक प्रवासाची आणि माझ्या कुटुंबाने घडवलेल्या सेवा-संस्कारांची ओळख आपल्या पुढे सादर करताना मला अत्यंत अभिमान वाटतो. बालपणापासून आपल्या परिसरात वाढताना सामान्य नागरिकांच्या समस्या, अपेक्षा, संघर्ष आणि त्यांची स्वप्ने मी जवळून पाहिली. शिक्षण घेत असतानाच मी कुटुंबासोबत समाजसेवेतील कामांना हातभार लावला आणि त्यातून "जनसंपर्क","जनसेवा" आणि "निश्चित परिणामकारक काम" यांची खरी परंपरा अनुभवली. मनपा शाळा, वसाहतीतील कामे, मनोरुग्णालय, कारागृह, रोजगार निर्मिती, कोरोना काळातील गरजूंना मदत आणि उपक्रम अशा अनेक उपक्रमांमधून मी आणि माझ्या कुटुंबाने सातत्याने जनतेसाठी काम केले आहे. आपल्या पाठिंब्यामुळेच आज मी समाजकारणात अधिक जबाबदारीने आणि दृढ निश्चयाने कार्यरत आहे.
सामाजिक कार्य करताना मला स्थानिक पातळीवरील प्रत्येक समस्येची वास्तव जाणीव झाली आणि "फक्त सेवा नाही तर धोरणात्मक पातळीवर काम करण्यासाठी राजकीय योगदान आवश्यक आहे" ही ठाम जाणीव निर्माण झाली. नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार आणि व्यसनमुक्त समाज या माझ्या कार्यदिशा ठरल्या. आपल्या परिसराचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि भविष्यातील नियोजन यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्याकडून मिळालेला भक्कम पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. मी आजवर केलेल्या प्रत्येक कामात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवा हीच मूल्ये जपली आहेत आणि पुढेही जनतेच्या हितासाठी अविरत कार्य करणार आहे, हा आपल्यापुढे दिलेला शब्द आहे.


counter-icon

10

+

वर्षे राजकीय सेवा

counter-icon

100

+

आयोजित कार्यक्रम

counter-icon

150

+

राबवलेले उपक्रम

counter-icon

200

+

विविध विकास कामे

अहवाल कामाचा

01

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

इयत्ता दहावी हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा मागील 4 ते 5 वर्षांपासून राबवण्यात येत आहे.

02

सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य

रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील पवित्र सण आहे. गेले 6 ते 7 वर्षांपासून मनोरुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा केला जातो. तसेच या वेळी प्रभागातील सर्व बंधूंना रक्षाबंधन निमित्त विशेष कार्ड वाटप करण्यात आले.

03

सामाजिक क्षेत्रातील कार्य

मनोरुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर मनोरुग्णांना स्वगृही पोहोचविण्यात आले.

04

सामाजिक क्षेत्रातील कार्य

मनोरुग्णालयात मनोरुग्ण बांधवांसाठी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले

05

सामाजिक क्षेत्रातील कार्य

सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या सहजरित्या मांडता याव्यात यासाठी जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन करण्यात आले.

06

सामाजिक क्षेत्रातील कार्य

आनंद मेळावा आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे आणि विचारांचे भंडार आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांच्या विरंगुळ्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.

07

सामाजिक क्षेत्रातील कार्य

रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेत रक्तदान करतानाचे फोटो.

08

सामाजिक क्षेत्रातील कार्य

जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते तेव्हा गरजूंना भोजन वाटप करण्यात येते.

कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी आम्हाला कॉल करा

+91 8999660290